पुणे : चारचाकी गाडीत पोलीस नावाची पाटीलावून आय बी असा लोगो लावून आयबीचा पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या तोतया पोलिसाला चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हा प्रकार चंदननगरमधील नागपोल रोडवरील मोकळ्या मैदानाच्या कडेला शुक्रवारी दुपारी अडीच वाजता घडला.
इमाउद्दीन नाफिरुद्दीन इरफान (वय ३७, रा. गोदरेज इन्फिनिटी सोसायटी, केशवनगर, मुंढवा) असे या तोतया पोलिसांचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार नामदेव विठ्ठल गडदरे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमाउद्दीन इरफान हा काळे रंगाची टोयाटा कार घेऊन तेथे आला होता. त्यात पोलीस अधिकारी वापरतात, तसे पोलीस नावाची नेमप्लेट लावली होती. गाडीत पोलीस लाठी व आय बी असा लोगो जवळ बाळगला होता. पोलिसांना शंका असल्याने त्यांनी चौकशी केल्यावर तो तोतया असल्याचे दिसून आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस हवालदार रणदिवे तपास करीत आहेत.