Site icon द पब्लिक न्यूज

PUNE : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने दहा लाख रुपयांची फसवणूक

Fraud_a22f56

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने दहा लाख रुपयांची फसवणूक

पुणे : रेल्वेत कायमस्वरुपी सरकारी नोकरी लावण्याचे आणिष दाखवत एकाची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


राजेश दिनकर राजगुरु (वय ५०, रा. हरीविश्व अपार्टमेंट, पाथर्डी शिवार, नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्याचे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चिंचवड परिसरातील एकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजेशशी २०२१ मध्ये ओळख झाली होती. तक्रारदाराच्या ओळखी असलेल्यांना त्याने रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. रेल्वेतील अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी त्याने तक्रारदाराकडे केली होती. त्यानंतर तक्रारदाराने राजगुरुला वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरुपात दहा लाख रुपये दिले. दहा लाख रुपये दिल्यानंतर राजगुरुने नोकरी लावली नाही. त्यानंतर राजगुरुने त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भेटायला बोलावले. तक्रारदाराच्या ईमेलवर त्याने रेल्वेत आरोग्य निरीक्षकपदावर नोकरी मिळाल्याबाबतचे बनावट नियुक्तीपत्र पाठविले. चौकशीत नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले. तक्रारदाराने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.

Exit mobile version