Site icon द पब्लिक न्यूज

 PUNE : जिल्हा युवा महोत्सव रंगणार दोन दिवस

District Youth Festival to be held for two days

 जिल्हा युवा महोत्सव रंगणार दोन दिवस

पुणे : जिल्हा क्रीडा अधिकारी, नेहरू युवा केंद्र संघटन, पुणे व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या विद्यमाने जिल्हास्तरावर युवा महोत्सवाचे दि. ५ व ६ डिसेंबर २०२४ रोजी आझम कॅम्पस येथे आयोजन करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्यावतीने दि. १२ ते १६ जानेवारी या कालावधीत दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवात जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंना सहभागी होता यावे, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

युवा महोत्सवामध्ये संकल्पना आधारीत स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत लोकनृत्य व लोकगीत, कौशल्य विकासाअंतर्गत कथा लेखन, कविता, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, भारत यंग लीडर्स डायलॉग (पंतप्रधान यांच्यासमवेत चर्चा) व युथ आयकॉन या उपक्रमांचा समावेश आहे.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी संबंधित शाळा, महाविद्यालये अथवा युवक-युवतींनी त्यांचे प्रवेश dsopune6@gmail.com वर किंवा ९५५२९-३१११९ या व्हॉट्स ॲप क्रमांकावर दि.३ डिसेंबर, तर विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग (पंतप्रधान यांच्या समवेत चर्चा) या उपक्रमात युवा संस्थांनी सहभागी होण्याकरीता https://mybharat.gov.in/ या संकेतस्थळावर ५ डिसेंबरपर्यंत नावे नोंदवावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

Exit mobile version