शिवसेनेचे दत्तात्रय गिलबिले यांची धारदार शास्त्राने मानेवर वार करत हत्या
पुणे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर गावचे माजी उपसरपंच आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले (वय ५१) यांच्या मानेवर धारधार शास्त्राने वार करत हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गिलबिले यांच्या हत्या झालीची माहिती परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली आहे.
दत्तात्रय गिलबिले यांच्या हत्येची बातमी समजताच शिक्रापूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मालमत्ता अथवा इतर कारणांमधून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. तसेच पोलीस पथक हल्लेखोरांच्या मागावर असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी दिली. ही घटना रविवारी (दि. १) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दत्तात्रय गिलबिले हे दुपारच्या वेळेस आपल्या बंगल्याच्या आवारात खुर्चीवर बसलेले असताना आरोपींनी धारदार शास्त्राने त्यांच्या मानेवर वार केले. या घटनेनंतर त्यांना तात्काळ पुणे येथे खासगी रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शिक्रापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.
—-