Site icon द पब्लिक न्यूज

Cyber Crime  : ऑनलाइन टास्कच्या आमिषाने तरुणाची २७ लाखांची फसवणूक

Young man cheated of Rs 27 lakhs with the lure of online tasks

पुणे : ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणूकीचे सत्र सुरु आहे. सायबर चोरट्यांच्या आमिषाला बळी पडून करोडो रुपयांचा फसवणूक करुन घेतल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. सायबर चोरट्यांनी वाघोलीतील एका तरुणाची ऑनलाइन टास्कच्या आमिषाने २७ लाख ४६ हजार रुपयांना गंडा घातला असून फसवणूक केली.

याबाबत वाघोलीतील केसनंद परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन टास्कमध्ये पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी तरुणाला दाखविले. ४ नोव्हेंबर रोजी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संपर्क साधला. घरातून ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष चोरट्यांनी त्याला दाखविले. सुरुवातीला चोरट्यांनी त्याला ऑनलाइन काम दिले. या कामापोटी त्याला परतावाही देण्यात आला. परतावा दिल्यानंतर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर पुन्हा संपर्क साधला. त्यानंतर तरुणाने चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी २७ लाख ४६ हजार रुपये गुंतविले. पैसे गुंतविल्यानंतर त्याला परतावा देण्यात आला नाही. त्यानंतर तरुणाने चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड तपास करत आहेत.

Exit mobile version