Site icon द पब्लिक न्यूज

Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, आझाद मैदानावर घेतली शपथ

Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, आझाद मैदानावर घेतली शपथ

मुंबई : मुंबईतील आझाद मैदानावर भव्य सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे २०वे मुख्यमंत्री म्हणून आज (दि.५) रोजी शपथ घेतली. या शपथविधी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांसह विविध राजकीय, समाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर उपस्थित झाल्यानंतर, ५ वाजून ३१ मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली.

देवेंद्र फडणवीस यांची शपथ:

देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताना म्हटले, “मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता आणि एकात्मता उन्नत राखेन. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या सर्व कर्तव्यात निष्ठापूर्वक आणि सद्सद्विवेक बुद्धीने पार पाडेन, आणि संविधान आणि कायद्याच्या कक्षेत सर्व नागरिकांना न्याय्य व निःपक्षपातीपणे वागणूक देईन.”

आणखी काय म्हणाले फडणवीस …

फडणवीस यांनी पुढे सांगितले, “मी, देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, मुख्यमंत्री म्हणून माझ्या अधिकाराखाली असलेल्या कोणत्याही गोष्टीचा प्रचार किंवा उघडपणे उलगड करण्याचा मी प्रयत्न करणार नाही. माझ्या कर्तव्यात कोणत्याही प्रकारच्या पक्षपातीपणाची वागणूक ठेवणार नाही.”

शपथविधी नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एक उत्साही वातावरण तयार झाले. या सोहळ्यात, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

यामुळे राज्यात एक नवा अध्याय सुरू झाला असून ‘देवेंद्र’ पर्व सुरु झाले आहे. आणि फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपदावर पुन्हा येणे ही राज्याच्या राजकारणात महत्त्वाची घटना मानली जात आहे.

Exit mobile version