Site icon द पब्लिक न्यूज

PMC : शहर स्वच्छतेसाठी महापालिकेचे सर्व विभाग येणार एकत्र

2761cf31-1138-4218-8e9a-7492f44fd300

संग्रहित फोटो

पुणे : शहरात रस्ते, मोकळ्या जागा, दुभाजक, पादचारी मार्ग यासह अन्य ठिकाणी कचरा पडलेला असतो, अस्वच्छता असते पण तेथे व्यवस्थित स्वच्छता न झाल्याने शहर बकाल झाले आहे. शहर पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने नियोजन केले आहे. एकाच वेळी सुमारे दीड हजार कर्मचारी एका क्षेत्रीय कार्यालयाच्‍या हद्दीत उतरवून साफसफाई केली जाणार आहे. परिमंडळ एकमध्ये ९ ते १४ डिसेंबर या कालावधी ही मोहीम राबविली जाईल. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयातून सोमवारपासून (दि. ९) ही मोहीम सुरु होईल.

शहर स्वच्छतेच्या संदर्भात आज पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी बैठक घेतली. त्यामध्ये १५ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त, आरोग्य निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक, आकाशचिन्ह विभाग, घनकचरा विभाग, विद्युत, उद्यान, पथ, मलनिःसारण यासह अन्य विभागाचे अधिकारी, मोहल्ला कमिटीचे सदस्य उपस्थित होते.


शहरात सध्या ठिकठिकाणी कचरा पडला आहे, दुभाजक अस्वच्छ झाले आहेत, त्यातील झाडे वेडीवाकडी वाढली आहेत. रस्ते व्यवस्थित झाडले जात नसल्याने धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तसेच अतिक्रमणामुळे रस्त्यावर कचरा, खरकटे अन्न टाकण्याचे प्रकार वाढल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. पण दैनंदिन स्वच्छता योग्य पद्धतीने केली जात नसल्याने व बेशिस्त नागरिकांवर कारवाई केली जात नसल्याने शहराचे बकालीकरण वाढले आहे.


ही स्थिती सुधारण्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्वंकष स्वच्छता (डीप क्लिनिंग) करण्याचे निर्णय घेतला आहे. यामध्ये महापालिकेचे सर्व विभाग, त्यातील कर्मचारी एकत्र येऊन दोन दिवसात एक क्षेत्रीय कार्यालय स्वच्छ करणार आहेत. प्रत्येक विभाग अतिरिक्त मनुष्यबळासह काम करणार असल्याने स्वच्छता केली जाईल. अतिक्रमण, अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई केली जाणार आहे.

अशी होणार स्वच्छता मोहीम

Exit mobile version