Site icon द पब्लिक न्यूज

बांगलादेशी हिंदूओके सन्मानमे … शिवसेना पुणे मैदान मे…

WhatsApp Image 2024-12-07 at 4.43.04 PM

बांगलादेशचा झेंडा पायदळी तुडवून व जाळून शिवसेनेकडून निषेध

बांगलादेशचा झेंडा पायदळी तुडवून शिवसेनेचे निषेध आंदोलन

पुणे : बांगलादेशी इस्कॉन या मानवतावादी, अध्यात्मिक संघटनेच्या सदस्यांविरोधात तेथील सरकार हल्ले, अन्याय व अत्याचार करत असल्याच्या निषेधार्थ आज (दि.७, शनिवारी) झाशीराणी पुतळा, बालगंधर्व चौक येथे शिवसेना पुणे शहराचे वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच बांगलादेशचा झेंडा पायदळी तुडवून व जाळून निषेध करण्यात आला.

भारतीयांवर बाहेर देशांमधील वाढते अत्याचार हल्ले थांबविण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरले आहे, शिवसेना पुणे शहराच्या वतीने यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली, मोदी सरकारची लाडकी बहीण … शेख हसीना … शेख हसीना” अशा घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यात आले. मोदी भक्तांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान मोदींच्या एका फोनमुळे रशिया – युक्रेनचे युध्द थांबले. मग बांगलादेशात हिंदूंवर होणारे हल्ले, अन्याय, अत्याचार थांबवण्यासाठी भक्तांनी दुसरा फोन करण्यासाठी पंतप्रधानाकडे आग्रह धरावा. फक्त निवडणुकीपुरते हिंदुत्व करायच नंतर पुर्णपणे दुर्लक्ष करायच हि भाजपची निती. बांगला देशातील हिंदूवरील हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत बांगला देशासोबत क्रिकेट बंद करा हि शिवसेना नेते आ आदित्य ठाकरे यांची मागणी अमलात आणा असे शहरप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले. बांगलादेशी हिंदूंविरोधातील अत्याचार थांबले नाही तर शिवसेना महाराष्ट्रात व पुणे शहरात विविध भागात उग्र आंदोलन करणार आणि झोपलेल्या केंद्र सरकारला जागे करणार आहे. असे आंदोलनात ठरविण्यात आले.

यावेळी धरणे आंदोलनात शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकूडे, विजय देशमुख, प्रशांत बधे, रामभाऊ पारिख, राजेंद्र शिंदे, संतोष गोपाळ, दत्ता घुले, उपशहप्रमुख भरत कुंभारकर, प्रशांत राणे, राजेश पळसकर, आबा निकम, उमेश वाघ, उत्तम भुजबळ, बाळासाहेब भांडे, अनंत घरत, प्रविण डोंगरे, विलास सोनवणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Exit mobile version