Site icon द पब्लिक न्यूज

PUNE : भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचे अपहरण

PUNE : भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचे अपहरण

भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा अपहरण करुन खून

पुणे : भाजपचे आणि विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांचे चारचाकी गाडीतून आलेल्या चौघांनी अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

सतीश वाघ असे टिळेकर यांच्या मामाचे नाव आहे. त्यांचे अपहरण झाल्याप्रकरणी वाघ यांच्या मुलाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या, आमदार योगेश टिळक यांचे मामा सतीश वाघ हे सकाळी सोलापूर रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल ब्लू बेरीसमोर थांबले होते. तिथे अचानक एक चारचाकी गाडी येऊन थांबली. त्या गाडीतून उतरलेल्या दोघांनी सतीश वाघ यांनी जबरदस्तीने गाडीत बसवले. सतीश वाघ यांचे चौघांनी अपहरण केले आहे. असे त्यांच्या मुलाने दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सतीश वाघ यांचे अपहरण करून त्यांना सोलापूरच्या दिशेने नेल्याची माहिती सतीश वाघ यांच्या मुलाने दिली. या प्रकरणाचा तपास हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे हे तपास करत आहेत.

Exit mobile version