महापालिकेच्या आरोग्य विभाग सज्ज, राज्य शासनाच्या नियमावलींचे पालन करण्याचे रुग्णालयांना आदेश
पुणे : कोरोना या महामारीने जगात खळबळ उडवून दिली होती. या रोगामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. कोरोनामुळे संपूर्ण जग थांबले होते. यातून सावरत नाही तोवरच चीनमधून ह्युमन मेटान्युमो व्हायरस (एचएमपीव्ही)ची पसरला असून याची अनेकांना लागण झाली आहे. यामुळे भीतीचे वातावरण पसरु लागले असले तरी हा विषाणू धोकादायक नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, मात्र काळजी घेण्याची आवश्यकत आहे. असे तज्ञांनी सांगितले आहे तर पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला असून राज्य शासनाच्या नियमावलींचे पालन करण्याचे रुग्णालयांना आदेश दिले आहेत.
चिनमध्ये या विषाणूने हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. आपल्या देशात या विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळून आला आहे. त्यानंतर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या आरोग्य विभागांसाठी नियमावली तयार केली आहे. याबाबत शुक्रवारी (ता.३) आणि सोमवारी (ता.६) रोजा राज्य शासनाची बैठक पार पडली. त्यावेळी ही नियमावली जाहीर केली असून महापालिकेच्या प्रत्येक रुग्णालयांना पाळण्याचे आदेश दिले आहेत.
पुण्यात या व्हायरस संदर्भात खबरदारीसाठी उपाययोजना करण्यात येत आहे. त्यात नागरिकांनी कशी काळजी घ्यावी या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयामध्ये ३५० बेडची व्यवस्था आहे. हे रुग्णालय विशेष संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या रुग्णालयातील व्यवस्था चोख ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात अजून एकाही रुग्ण नाही पण महापालिका खबरदारीचा उपाय म्हणून बेड राखीव ठेवण्यासाठी पत्र देण्यात आले आहेत.
विषाणूची चर्चा होत असली तरी त्याला घाबरु नये, नेहमीप्रमाणे आपण काळजी घ्यावी. कोरोना काळात ज्याप्रमाणे मास्क, सॅनिटायझर वापरले त्याप्रमाणेच काळजी घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यात ताप येणे, सर्दी, खोकला असे आजार होत असतात. अती अशक्तपणा येणे, उलट्या होणे, ताप वाढणे, श्वासनाचा त्रास होत असेल तर रुग्णालयात अॅडमीट डॉक्टरांच्या सल्ल्याने केले जाते. अशा रुग्णांचा माहिती गोळा करण्याची तसेच महापालिकेला तात्काळ देण्याचे सांगण्यात आले आहे. सध्यातरी कोणत्याही रुग्णाचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले जात नाहीत. गंभीर रुग्ण आढळून आला तर त्याचे सॅम्पल घेवून तपासणीसाठी पाठवले जातील. पुणे विमानतळावर परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी सध्यातरी केली जात नाही. परंतु याबाबत बैठक घेवून तपासणी करण्याचा निर्णय घेतला जाईल.
- नीना बोराडे, आरोग्य विभाग प्रमुख, पुणे महापालिका.
तज्ञ म्हणतात…
- एचएमपीव्ही हा साधा संसर्गजन्य विषाणू आहे.
- नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही.
- २००१ मध्ये सीडीसी यांच्याकडे हा व्हायरस डिटेक्ट झाला होता
- नवीन आलेला व्हायरस नाही.
- ज्येष्ठ आणि बालकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
- त्यासोबतच श्वसनाचे आजार असलेल्यांनीदेखील काळजी घेतली पाहिजे.
- कोरोनासारखा पसरणार नाही. घाबरण्याची गरज नाही.
हे करा:
- जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
-साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा. - ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा,
- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा
- संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.
एचएमपीव्ही विषाणूचे लक्षणे कोणती?
- कोरोना सारखे लक्षण
- ताप आणि खोकला
- श्वास घ्यायला त्रास
- फुफ्फुसात संक्रमण
- नाक बंद होणं
- गळ्यात घरघर होणं
- संसर्गजन्य रोग, संपर्कात आल्याने पसरतो.
कोणती काळजी घ्यावी?
- सतत हात धुत राहणे
- स्वतछता बाळगणे
- घाण हात नाकातोंडाला न लावणे.
- खोकला असेल तर मास्क किवा रुमाल वापरणे.
- हस्तांदोलन
- टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर
- आजारी लोकाशी जवळचा संपर्क
- डोळे, नाक आणि तोडाला वारंवार स्पर्श करणे.
HMPV #PuneHealth #VirusAlert #PandemicUpdate #HealthPrecautions #SafetyMeasures #PuneMunicipalCorporation #VirusSpread #WinterHealth #CoronaLikeSymptoms #StaySafe #HealthGuidelines #Metanyumovirus #PublicHealth #VirusPrevention