Site icon द पब्लिक न्यूज

२२ वर्षीय तरुणाकडून गावठी जिवंत काडतूसासह गावठी पिस्तूल जप्त ; नांदेड सिटी पोलीसांची कारवाई

२२ वर्षीय तरुणाकडून गावठी जिवंत काडतूसासह गावठी पिस्तूल जप्त ; नांदेड सिटी पोलीसांची कारवाई

२२ वर्षीय तरुणाकडून गावठी जिवंत काडतूसासह गावठी पिस्तूल जप्त

पुणे: नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धायरी गाव येथील स्मशानभूमी परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

विशाल तानाजी कधीरे (वय 22, रा. मुक्तांगण बिल्डिंग, काळुबाई मंदिर मागे, धायरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3 (25) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेडसिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी दिलेल्या माहितीनुसार,   पोलीस शिपाई योगेश झेंडे आणि पुरुषोत्तम गुनला यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धायरी गाव येथील शेवटच्या बस थांब्याजवळील स्मशानभूमीमध्ये एक व्यक्ति पिस्तूल घेऊन उभा असल्याचे समजले. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोस वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून  पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे आणि तपास पथकासह त्याठिकाणी जाऊन त्या व्यक्तिला ताब्यात घेतले.  

त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याचे नाव विशाल तानाजी कधीरे  असल्याचे समजले. तसेच  त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. पंचांसमक्ष शस्त्र हस्तगत करून आरोपीविरुद्ध नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नांदेड सिटी पोलीस करत आहेत.

;

Exit mobile version