Site icon द पब्लिक न्यूज

स्वारगेट आत्याचार प्रकरण ; आरोपीला ३ दिवसांनंतर ठोकल्या बेड्या, आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

स्वारगेट आत्याचार प्रकरण ; आरोपीला ३ दिवसांनंतर ठोकल्या बेड्या, आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

स्वारगेट अत्याचार प्रकरण : आरोपीची माहिती देणाऱ्याला मिळणार एक लाख रुपयांचे बक्षीस

पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील ३ दिवसांच्या पोलिसांच्या शोध मोहिमेनंतर अखेर आरोपीला पकडण्यास यश आले आहे. आरोपीला रात्री १:१० वाजता शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून अटक करण्यात आली. ५०० पोलिस अधिकारी आणि ४०० ते ५०० स्थानिक नागरिकांकडून आरोपीला शोध घेतला जात होता. अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रसार माध्यमांना दिली.

आयुक्त कुमार म्हणाले, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि श्वान पथकांचा वापर केला. शोध मोहिमेत नागरिकांनी देखिल मोठे सहकार्य केले. स्थानिक नागरिकांचे त्यांनी आभार मानले आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल पोलिस त्यांचा सन्मान करणार असल्याचे जाहीर केले.

आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाईल आणि पोलिस त्याच्याविरुद्ध जलदगती खटला दाखल करणार आहेत. महिलांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यासाठी अंधारात असलेल्या ठिकाणी रस्त्यावरील पथ दिवे लावणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. ही योजना “सेफनेट” या नावाने असेल असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आरोपींना अटक करण्यास विलंब झाल्याचे त्यांनी मान्य केले. पण आज त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला आज कोर्टात सादर केलं जाणार आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस वचनबद्ध असल्याचे आश्वासन दिले. प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार आरोपीच्या गळ्यावर दोरीचे वळ आहेत, या वळानुसार त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असं आरोपीने सांगितलं आहे. परंतु, दोरी तुटल्यामुळे आणि इतर लोक आल्यामुळे त्याचा जीव वाचला. असेही त्यांनी सांगितले.

अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, स्मार्तना पोलिस उपायुक्त, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल सागर केकण, शंकर संपते, नाना भांडुरगे, सुजय पवार आणि कुंदन शिंदे यांनी ही कारवाई केली.

एक लाखांचं बक्षिस दिले जाणार..
आरोपीची शेवटच्या माहितीवरून त्याला पोलिसांनी पकडले. शेवटची माहिती आली की तो कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता. तो कोणालातरी दिसला आणि मग तो तिथून पळाला. ड्रोनच्या सहाय्याने जी दिशा दिसली, त्यातून त्याला अटक करण्यात आली. ज्याने शेवटची माहिती दिली, त्याला एक लाखांचं बक्षिस देण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त गावासाठी काय करता येणार, याचाही आम्ही विचार करणार आहोत. असे अमितेश कुमार म्हणाले.

Exit mobile version