Site icon द पब्लिक न्यूज

११ व्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

११ व्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

११ व्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, दि.२ : देशभरातील चित्रपट दिग्दर्शक व निर्मात्यांना सुवर्णसंधी देणारा ११ वा अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (AIFF) दिनांक २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहे. या महोत्सवासाठी ‘ भारतीय स्पर्धागट’ विभागांतर्गत चित्रपट पाठविण्यासाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

२०१४ मध्ये मराठवाड्यातील चित्रपटकार, समीक्षक, कलाकार व सांस्कृतिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या महोत्सवाने आजवर राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. ‘मराठवाडा आर्ट, कल्चर अँड फिल्म फाउंडेशन’च्या वतीने, नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. भारत सरकारच्या सूचना एवं प्रसारण मंत्रालय, NFDF, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र रंगभूमी, चित्रपट व सांस्कृतिक विकास महामंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

पात्रता निकष:

पुरस्कार:

महत्त्वाचे आकर्षण:

प्रवेशिका सादर करण्याची शेवटची तारीख:

प्रवेशिकेसाठी अधिक माहिती व फॉर्म www.aifilmfest.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लिंक : https://aifilmfest.in/entry-form-aiff-2026 अधिक माहितीसाठी info@aifilmfest.in या ईमेलवर संपर्क साधता येणार आहे.

चित्रपटप्रेमी, कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासाठी ही पर्वणी ठरणारा अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. हा महोत्सव चित्रपट प्रदर्शनाचे नव्हे तर संवाद, ज्ञानवर्धन आणि सांस्कृतिक समृद्धीचे व्यासपीठ आहे.

Exit mobile version