Site icon द पब्लिक न्यूज

लोहगाव नवीन हाद्दीत २४ इमारती जमीनदोस्त

लोहगाव नवीन हाद्दीत २४ इमारती जमीनदोस्त

लोहगाव नवीन हाद्दीत २४ इमारती जमीनदोस्त

पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाची कारवाई, न्यायालयासमोर अहवाल सादर करणार

पुणे : लोहगाव नवीन हद्दीमध्ये हवाई दलाने प्रतिबंधित केलेल्या ९०० मीटरच्या बॉम्बेडंप भागातील २४ इमारती पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने जमीनदोस्त केल्या. या भागातील २४ इमारती पाडून टाकून सुमारे ४८ हजार चौरस मीटरवरील अनधिकृत बांधकामावर पालिकेने हातोडा चालविला.

बांधकाम विभागाने या भागातील २४ जणांना नोटीस बजावली होती. त्यावर मंगळवारी (दि. २४ ) धडक कारवाई केली. या कारवाई सुमारे ४८ हजार चौरस फुटाचे बांधकाम पाडून टाकण्यात आले. यामध्ये जेसीबी, जॉ कटर या मशिनचा वापर करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नव्याने बांधकाम केलेल्या नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

लोहगाव विमानतळ हे हवाई दलासाठी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या विमानतळाच्या परिसरात बांधकामे होऊ नयेत यासाठी केंद्र शासनाची नियमावली आहे. जी बांधकामे झाली आहेत ती पाडून टाकण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून महापालिकेने सर्वेक्षण सुरु केले आहे. त्यामुळे हा मुद्दा ज्वलंत असताना त्यातच पालिकेने बफर झोन भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर जोरदार कारवाई केली. या भागातील नागरिक पालिकेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत. न्यायालयाला पालिकेकडून या भागात केलेल्या कारवाईचा अहवाल सादर केला जाणार आहे.

नागरिकांनी हवाई दलाच्या संरक्षण भिंतीच्या १०० मीटर, १०० मीटर प्रतिबंधित क्षेत्रात येणाऱ्या जागेत तसेच शेती झोन क्षेत्रात बांधकाम करून नव्याने अतिक्रमण बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे २४ जणांना नोटिसा देऊन ही बांधकामे पाडून टाकण्यात आले आहेत. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एम. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता इरफान शेख, सौरभ खुराड यांच्या सह बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस या कारवाईत सहभागी झाले होते.
असे बांधकाम विभागाचे उप अभियंता इरफान शेख यांनी सांगितले.

—-
– एअर फोर्स ने प्रतिबंधित केलेलं ९०० मीटर बॉम्बडंप भागात कारवाई
– एकूण दिलेल्या नोटीसा – २४
– कारवाई केलेली संख्या – २४
– कारवाई चे एकूण क्षेत्र- ४८, 000चौरस. फूट
– कारवाई केलेल्या बांधकामाचा प्रकार – आर.सी.सी व वीट बांधकाम

Exit mobile version