Site icon द पब्लिक न्यूज

मिळकतकर सवलतीच्या दरात भरण्यासाठी मुदतवाढ

संग्रहित फोटो

 

PUNE: पुणे महापालिकेने मिळकतकर सवलतीच्या दरात भरण्यासाठी ३० जूनची मुदत दिली होती. परंतु सर्व्हर डाऊन तसेच ४० टक्के सवलतीचा गोंधळ यामुळे मिळकतदारांना कर भरण्यास अडथळा येत होता. शेवटच्या दिवशी नागरिकांनी कर भरण्यासाठी गर्दी केली होती. परंतु सर्व्हर डाऊनमुळे त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे मिळकतदारांना मिळकतकर सवलतीच्या दरात भरण्यासाठी मुदतवाढीची मागणी केली जात होती. त्यानुसार महापालिकेने ७ जुलैपर्यंत कर भरण्यास मुदतवाढ दिली आहे.

महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने मिळकत कराची बिलं दिल्यानंतर १ मे ते ३० जून अखेर ७ लाख १० हजार ५५३ इतक्या मिळकतधारकांनी १२४४.५० कोटी इतका मिळकतकराचा भरणा केला आहे. या मुदतीत मिळकतीचा संपूर्ण कर भरणाऱ्या मिळकतदारांना ५ ते १० टक्क्यांची सवलत देण्यात आली होती. याच सवलतीच्या दरात ७ जुलै २०२५ पर्यंत कर भरता येणार आहे. त्यामुळे मिळकतदारांना कर भरावा असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी सर्व नागरी सुविधा केंद्र सकाळी १० ते ४ पर्यंत सुरु राहतील. तरी, सर्व मिळकतधारकांना आवाहन करण्यात येते की, शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आपला मिळकतकर नागरी सुविधा केंद्र तसेच ऑनलाईनद्वारे त्वरित भरण्यात यावा, असेही आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपआयुक्त
अविनाश सकपाळ यांनी केले आहे.

Exit mobile version