Site icon द पब्लिक न्यूज

पुणेकरांनी मला माफ करावे ; मी लक्ष देऊ शकलो नाही ; उद्धव ठाकरे

images (1)

उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही साधला निशाणा

पुणे : मी ज्यावेळी मुख्यमंत्री होतो. त्यावेळी पुण्याकडे लक्ष देवू शकलो नाही. त्यामुळे मला पुणेकरांनी माफ करावे. करोना काळात तेव्हा मी एकदा पुण्यात आलो होतो आणि सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या होत्या. पुणेकर म्हणत असतील तर पुढे मी पुण्यात नक्की लक्ष घालीन,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच पुण्याची दादागिरी मोडली का आहे, असा प्रश्न करुन उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला.

पुणे श्रमिक पत्रकार संघात शनिवारी आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. यावेळी खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख सचिन आहिर, पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, खजिनदार दिलीप तायडे उपस्थित होते.

राज्यात अनेक वर्षांनंतर एवढ्या मोठ्या बहुमतातील सरकार सत्तेवर आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार चालविताना हतबल झाले आहेत. कशासाठी हतबल आहेत मला कल्पना नाही. त्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे. अनेक वर्षानंतर एवढे मोठे संख्याबळ असलेले त्यांचे सरकार आहे. केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी आहे. अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाते, पण भ्रष्टाचारी मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढले जात नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर होती, तेव्हा प्रखर हिंदूत्व आणि भाजपला सोडले म्हणून हिंदूत्व सोडले का? मुस्लीमांना खुश करण्यासाठी भाजपने ‘सौगाद-ए-मोदी’ चे वाटप केले. त्यांनी मुस्लीमांसाठी काही केले तर ते ‘अमर प्रेम’ आणि इतरांनी मुस्लिमांची बाजू घेतली तर ते ‘लव्ह जिहाद, अशा शब्दातही ठाकरे यांनी समाचार घेतला.

काँग्रेसबरोबर गेलो म्हणून शिवसेनेने हिंदूत्व सोडले अशी ओरड भाजपकडून केली जाते. मग तुम्ही चंद्राबाबू, नितिशकुमार यांच्याबरोबर गेला मग हे दोघे हिंदुत्ववादी आहेत का? ३२ लाख मुस्लीमांना सौगात-ए- मोदी वाटली. तरी भाजप हिंदुत्ववादी आहे का? ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या सौफिया कुरेशी यांना पाकिस्तान की बहिण असे भाजपच्या नेत्यांकडून संबोधले जाते. त्यांना माध्यमांकडून प्रश्न विचारले जात नसल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.

आपल्या देशाला आता पंतप्रधानांची आणि गृहमंत्र्यांची गरज आहे. कारण, आत्ताचे पंतप्रधान व गृहमंत्री देशाचे नाही, तर ते एका पक्षाचे आहेत. जेव्हा आम्ही भाजपसोबत होतो, तेव्हा कडवट हिंदुत्ववादी होतो, आणि त्यांचापासून दूर गेलो तर आम्ही हिंदुत्व सोडले. हे म्हणजे भाजपसोबत असल्यावर अमर प्रेम आणि त्यांना सोडल्यावर लव्ह जिहाद. आज चंद्राबाबू नायडू, नितीशकुमार भाजप सोबत आहेत, मग ते हिंदुत्ववादी आहेत का, भाजपमधील मुस्लिम नेते हिंदुत्ववादी आहेत का ? असा सवालही ठाकरे यांनी व्यक्त केला.

अनेक वर्षानंतर आम्ही दोन भाऊ एकत्र आलो आहोत. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहे. आम्ही रोज उठून एकत्र आहोत, हे सांगायची गरज नाही. निवडणूक आल्यावर सर्व गोष्टी स्पष्ट होतील. भरभरून देवूनही ज्यांनी गद्दारी केली, त्या नमक हरामांना मी उत्तर देत नाही. ज्यांनी पक्ष, निशानी व बाप चोरला त्यांचे निवडणुकीतील मेरीट कसले तपासायचे. पूरामुळे उभे पिक वाहून गेल्यानंतर, जसा शेतकरी जमिन, जमिनीचा कस आणि मेहनत या बळावर पुन्हा उभा राहतो, तसा मीही पुन्हा पक्ष उभा करून. मला केवळ माझा पक्ष बांधायचा नाही तर पक्षासोबत राज्य व देश बांधायचा आहे, असेही ठाकरे म्हणाले.

सरकारला केवळ हिंदु मुस्लिम वाद पेटवण्यात रस
मी मुख्यमंत्री असताना कोरोना काळात न मागता शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. आता अतिवृष्टीमुळे व पूराच्या पाण्यामुळे शेतकरी उद्धवस्त झाला आहे, तरीही त्याला मदत केली जात नाही, अद्यापही केंद्राचे पथक पाहणीसाठी राज्यात आलेले नाही. सरकारला केवळ हिंदु मुस्लिम वाद पेटवण्यात रस आहे. सगळी शहरे बिल्डरांची माहेर घरे झालेली आहेत. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाला हानी पोहचवली जात आहे.
———
अंधभक्तांना दृष्टी देण्याची जबाबदारी पत्रकारांनी घेतली पाहिजे
पत्रकार म्हणून टिळक, आगरकर यांची नावे घेतो. पण त्यांची पत्रकारिता आज राहिली आहे का? चुकीचे काम करणाऱ्या सरकारला ‘तुमचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा प्रश्न विचारण्याची हिंमत आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचे कर्तव्य पत्रकारांनी बजाविले पाहिजे असे सांगतानाच आज अंधभक्त वर्ग जन्माला आला आहे. त्या अंधभक्तांना दृष्टी देण्याची जबाबदारी पत्रकारांनी घेतली पाहिजे, अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली.
————-
आपण सरकारला प्रश्न विचारू शकतो का ?

पत्रकार म्हटल्यानंतर आपण थेट टिळक आणि आगरकरांची आठवण काढतो. त्यांच्या प्रमाणे आपण सरकारच्या विरोधात लिहू शकतो का ? सोनम वांगचुक हे जेव्हा पंतप्रधानांची स्तुती करत होते, तेव्हा ते देश प्रेमी होते. मग असे नेमके काय घडले, त्यांच्यावर रासुका अंतर्गत कारवाई केली. जेव्हा मणिपूर पेटले होते, तेव्हा सरकारने काय केले. यावर माध्यमांमध्ये बातम्या का नाहीत ? मत चोरीबद्दल माध्यमांमध्ये काही येत नाही. मग आपण पत्रकार म्हणून घेण्याच्या पात्रतेचे आहोत का? आपल्याला टिळक – आगरकरांची परंपरा सांगण्याचा अधिकार आहे का ? याचा विचार आपण सगळ्यांनी करणे गरजेचे आहे. पत्रकारांनी निष्पक्षपणे आपले कर्तव्य बजावत अंध भक्तांना दृष्टी देण्याचे काम करणे गरजेचे आहे.
———————–

निवडणूक आघाडीच्या माध्यमातून लढवण्यास हरकत नाही –
आतापर्यंतच्या आम्ही लोकसभा आणि विधानसभा महाविकास आघाडी म्हणून लढलो. आता महापालिकेच्या निवडणुकाही आघाडीच्या माध्यमातून लढण्यास हरकत नाही. पण तिन्ही पक्षांना त्यांचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. निवडणूक जवळ आल्यावर आम्ही चर्चा करू. मात्र ही निवडणूक स्थानिक असल्याने स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेऊ. बिहार निवडणुकीच्या पाश्वभूमीवर केंद्र सरकारने प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात १० हजार रुपये जमा केले आहेत. काँग्रेसने तेथील मत चोरी समोर आणली आहे. तेथे शिवसेना पायात पाय घालणार नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले

 

Exit mobile version