महापालिकेच्या विरोधात दशक्रिया विधी आंदोलन
PUNE : वडगाव शेरी मतदार संघात दररोज नियमित किमान अडीच तास पाणीपुरवठा व्हावा. तसेच सुरु असलेल्या पाण्याच्या टाक्यांची कामे पूर्ण करावी. मतदार संघातील प्रलंबित रस्त्यांच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करुन वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवा. मतदार संघातील राजीव गांधी रुग्णालय, कळस लोहगाव, वडगाव शेरी, खराडी येथील पुणे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये परिपूर्ण सुविधांसह उपचार व्हावेत. अशा मागण्या करत वडगाव शेरीतील नागरिकांनी पुणे महापालिकेच्या विरोधात आक्रोश केला. तसेच महापालिकेच्या विविध विभागांच्या विरोधाची नावे दशक्रिया विधी करत आंदोलन केले.
वडगावशेरी भागातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पायाभूत सुविधांपासून वंचिक राहावे लागत आहे. पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे तक्रार करुनही प्रश्न सुटत नसल्यामुळे वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वात पुणे महापालिकेच्या इमारतीच्या गेट समोर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
—
वडगाव शेरी मतदार संघात दररोज पुणे शहराप्रमाणे नियमित किमान अडीच तास पाणीपुरवठा व्हावा. प्रत्येकाला नळ कनेक्शन देण्यात यावे. नागरिकांना व सोसायटी धारकांना लाखो रुपयांचे पाणी विकत घ्यावे लागते. वाघोलीमधील जुनी पाण्याची योजना अपुरी पडत आहे. त्यांना भामा आसखेडच्या मधून लवकर पाणी लाईन टाकण्यात येवून त्यांना पाणी द्यावे. या कामांसाठी पुणे महापालिका आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. अनेकवेळा प्रशासनाला सूचना, निर्देश देवून कामे होत नसल्यामुळे नागरिकांच संताप वाढत आहेत. त्यातून हे जनआंदोलन आज एवढ्या मोठ्या नागरिक करत आहेत.
– बापूसाहेब पठारे, आमदार, वडगाव शेरी मतदारसंघ.
—
प्रमुख मागण्या…
१. मतदार संघातील प्रलंबित रस्त्यांच्या कामामुळे वाघोली लोहगाव रोड सिम्बॉयसिस रोड येथे वाहतूक कोंडी होत त्यासाठी येथील व खंडोबा माळ रोड पठारे वस्ती रोड डी वाय पाटील रोड वडगाव शिंदे रोड वॉटर पार्क रोड वाघोली रोड ते लोहगावातून नगर रोड दक्षिण उत्तर रस्ता तातडीने पूर्ण करून रस्ते करून खड्डे बुजून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवा.
२. राजीव गांधी रुग्णालय तसेच कळस, लोहगाव, वाघोली वडगाव शेरी, खराडी येथील पुणे मनपाच्या रुग्णालयांमध्ये परिपूर्ण सुविधांसह उपचार व्हावेत. ४. लोहगाव वाघोली येरवडा जाधव नगर नदी किनाऱ्याचा भाग कळस धानोरी वडगाव शेरी या पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते तेथे ड्रेनेज व पावसाळी पाण्याच्या लाईन टाकणे विमान नगर येथील ड्रेनेज लाईन कायम जाम असते ही कामे तातडीने पूर्ण करणे.
३. धानोरी, लोहगाव, वाघोली वडगाव शेरी, खराडी भागातील डीपी व आर पी तील रस्ते बकोरी भावडी रस्ता वाघोलीला पर्यायी रस्ता पोरवाल रोड लोहगाव धानोरी शिव रोड आखणी रुंदीकरण करून विकसित करणे
४. गार्डन साठी आरक्षित जागेवर गार्डन क्रीडांगणे विकसित करणे.
५. लोहगाव, धानोरी, वडगाव शेरी, कळस वाघोली भागातील स्मशानभूमी विकसित करणे.
६. उर्वरित लोहगाव, वाघोली या समाविष्ट गावांचा विकास आराखडा तातडीने मंजूर करावा. म्हणजे लोकांना नियमित बांधकामे करून घरे बांधता येतील लोकांची घरे वाचतील
७. पुणे मनपा हद्दीतील मिळकत कर करिता अभय योजना राबवावी. माजी सैनिकांना सरसकट कर व्याज माफी करावी
८. सर्व भागात स्ट्रीट लाईट दुरुस्त करून नवीन पोल देण्यात यावे
९. ज्येष्ठांसाठी साठी विरंगुळा केंद्र व महिला उद्योग उभे करावेत यावेत
१०. संत तुकाराम महाराज मंदिर व वाघोली चे महादेव मंदिराचा भक्ती शक्ती चौक परिसर विकसित करण्यात यावा
११. आठवडे बाजार विकसित करून ओट बांधण्यात यावे
१२. कचऱ्यांच्या गाड्यांचे कामगारांचे व साधनांचे संख्या वाढवण्यात यावी
—