Site icon द पब्लिक न्यूज

पुणे महापालिकेला फटाक्यांच्या स्टॉल्सच्या ऑनलाइन लिलावातून मिळाले ८३ लाखांचे उत्पन्न

download (32)

शहरात १२५ फटाक्यांच्या स्टॉल्सचा लिलाव , तर ६७ स्टॉल्सला नाही मिळाला प्रतिसाद

पुणे: दिवाळी सणाच्या निमित्ताने पुणे महापालिका गेल्या तीन वर्षांपासून फटाक्यांच्या स्टॉल्सचे ऑनलाइन लिलाव करत आहे. या वर्षी, महापालिकेने शहरातील १३ ठिकाणी एकूण १९२ फटाक्यांच्या स्टॉल्सचा लिलाव केला. या प्रक्रियेद्वारे एकूण १२५ स्टॉल्सचा लिलाव करण्यात आला, ज्यामुळे एकूण ८३ लाखांचे उत्पन्न मिळाले. यापैकी, शनिवार पेठेतील वर्तक बागेजवळील नदीकाठावर असलेल्या ४० स्टॉल्सना सर्वाधिक बोली लागल्या, ज्यापैकी सर्वाधिक बोली ६९ लाख होती. ऑनलाइन लिलावात, १९२ पैकी ६७ स्टॉल्सचा लिलाव झाला नाही.

पुणे महापालिका २०२३ पासून फटाक्यांच्या स्टॉल्ससाठी ऑनलाइन लिलाव करत आहे. हा निर्णय फायदेशीर ठरत आहे. या वर्षीही महापालिकेने शहरातील १३ वेगवेगळ्या ठिकाणी १९२ फटाक्यांच्या स्टॉलसाठी ऑनलाइन लिलाव केले. शनिवार पेठ रिव्हरसाईड, कोंढवा खुर्द (अग्निशमन केंद्र), हडपसर, धानोरी, कोथरूड, कात्रज, पर्वती, धायरी, खराडी, बालेवाडी, हडपसर (सीझन मॉल), वारजे (आरएमडी कॉलेज), लोहेगाव आदी ठिकाणी एकूण १९२ स्टॉलसाठी लिलाव झाले. यापैकी १२५ फटाक्यांच्या स्टॉलचा लिलाव करण्यात आला. यातून महापालिकेला एकूण ८३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण जास्त आहे, असे महापालिका प्रशासनाने सांगितले.

Exit mobile version