पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. प्रचारादरम्यान मोठ मोठ्या आश्वासनांची वाफा सोडण्यात आल्या., महागाईवर बोलण्यात आले. त्यानंतर मतदानाची प्रक्रिया पार पडण्याची वाट पाहिल्यानंतर तात्काळ आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतीत वाढ होत असल्याचे कारण देत सीएनजीच्या दरात स्थानिक पातळीवर २ रुपये प्रतिकिलो वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती वाढत असल्याने सीएनजीला पसंती देणाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सीएनजी दर आता प्रतिकिलो ८७.९० रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, पाईप्ड नॅचरल गॅसच्या (पीएनजी) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये सीएनजी दरवाढीचा दणका बसला आहे. सीएनजीचा दर आता प्रतिकिलो ८७.९० रुपये झाला असला तरी त्यातून पुण्यातील मोटारचालकांची पेट्रोलच्या तुलनेत ४९ टक्के आणि डिझेलच्या तुलनेत २७ टक्के बचत होत असून रिक्षाचालकांची २९ टक्के बचत होत आहे, असे कंपनीने सप्टेबरमधील दरवाढीवेळी म्हटले होते. यावर्षी जुलै महिन्यातही सीएनजीचे दर वाढले होते. सध्या इंधनाचे दर वाढले असून पेट्रोल आणि डिझेल महागल्याने वाहनचालक पर्यावरणपूरक सीएनजीला पसंती देत आहेत. मात्र, आता सीएनजीचे दरही वाढू लागले आहेत. पुण्यात जुलैमध्ये सीएनजीच्या दरात प्रतिकिलो दीड रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सीएनजीचा दर त्यावेळी प्रतिकिलो ८५ रुपयांवर पोहोचला होता. सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहनाचालकांच्या खिशाला झळ बसत आहे.
पर्यावरणपूरक वाहने वापरण्याला सरकारकडून आवाहन केले जात आहे. तसेच इलेक्ट्रीक वाहनांसाठी योजना आखली जात आहे. इंधन दरवाढीला त्रासून अनेकांकडून