
केंद्र सरकारने वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली पर्यंत विस्तारित मेट्रो मार्गाला दिली मान्यता
प्रकल्पाची किंमत ३,७५६ कोटी रुपये, लांबी १२.७५ किमी आणि १३ स्थानके
PUNE : शहरातील PUNE METRO पुणे मेट्रोच्या दोन विस्तारीत मार्गांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यामध्ये वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते विठ्ठलवाडी या मार्गांचा समावेश असून, या निर्णयामुळे पुणेकरांच्या दैनंदिन प्रवास सुखकर होणार आहे.
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील वनाझ ते रामवाडी मार्गाच्या विस्ताराला केंद्र सरकारने बुधवारी मान्यता दिली, म्हणजेच वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली प्रकल्प. गेल्या वर्षी राज्य सरकारने या विस्तारित मार्गाला मान्यता दिली होती. या प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबित होता. अखेर केंद्र सरकारने या विस्तारित मार्गाला मान्यता दिली आहे. वनाझ ते चांदणी चौक या १.२ किमी लांबीच्या मार्गावर कोथरूड पीएमटी डेपो आणि चांदणी चौक अशी दोन स्थानके असतील. त्याच वेळी, रामवाडी ते वाघोली या ११.६३ किमी विस्तारात ११ स्थानके असतील. हा मार्ग खर्डी बायपास, वाघोली, विठ्ठलवाडी असा असेल. १२.७५ किमी लांबीचा आणि १३ उन्नत स्थानकांचा हा पूर्णपणे उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प, ज्याची किंमत एकूण रु. ३,७५६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प महामेट्रो मार्फत राबविला जाईल.
वाहतूक कोंडीमुळे त्रस्त पुणेकरांना दिलासा देण्यासाठी, शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. यामध्ये मेट्रो प्रकल्पांचाही विस्तार केला जात आहे. याअंतर्गत, जुलै २०२२ मध्ये, महामेट्रोने वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गाच्या विस्तारासाठी डीपीआर पुणे महानगरपालिकेला सादर केला. यामध्ये वनाज ते चांदणी चौकापर्यंत १.२ किमी आणि रामवाडी ते वाघोलीपर्यंत ११.६३ किमी लांबीचा विस्तार करायचा आहे. या विस्ताराचा प्रस्ताव ऑगस्ट २०२३ मध्ये महापालिकेने मंजूर करून राज्य सरकारकडे पाठवला. राज्य सरकारने मार्च २०२४ मध्ये या प्रस्तावाला मंजुरी दिली. वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली पर्यंत विस्तारित मेट्रो मार्ग पूर्णपणे उन्नत मेट्रो असेल. दोन्ही विस्तारित मार्गांसह, १२.७५ किमी लांबीच्या आणि १३ उन्नत स्थानके असलेल्या या प्रकल्पाचा एकूण खर्च ३,७५६ कोटी रुपये असेल. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा वाटा प्रत्येकी ४९६ कोटी ७३ लाख रुपये (१५.४० टक्के) असेल. यापैकी राज्य सरकारचा ४९६ कोटी रुपयांचा हिस्सा महामेट्रोला देण्याच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने आता या विस्तारित मार्गाला मान्यता दिली आहे. या मंजुरीमुळे पुणेकरांना प्रवासाचा अधिक सोयीस्कर आणि जलद मार्ग उपलब्ध होईल. हे दोन्ही मार्ग शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांना मेट्रो कनेक्टिव्हिटी प्रदान करतील. यामुळे चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली अशा तीस वाढणाऱ्या उपनगरांना मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळेल. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.