
गौतमी पाटीलला उचलायची का नाही ?? मंत्री चंद्रकांत पाटील यांचा थेट डीसीपी संभाजी पाटील यांना प्रश्न
पुणे : नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघात प्रकरणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आक्रमक झाले असून, सदर प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशा सूचना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.
नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनाने 30 सप्टेंबर रोजी एका रिक्षाला वडगाव पुलाजवळ मागूनजोरदार धडक दिली. त्यामध्ये रिक्षाचालक मरगळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सदर प्रकरणी आज मरगळे कुटुंबियांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात भेट घेऊन; मदतीची मागणी केली. त्यावर ना. पाटील यांनी डीसीपी संभाजी पाटील यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधून दोषींवर कठोर कारवाई करा, असे निर्देश दिले.