सर्वांना हवी हवीशी वाटणारी गुलाबी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. थंडी वाजू नये म्हणून स्वेटर परिधान केले जातात. पण या मध्ये आपलं स्टाइलिश दिसणं देखील आजच्या फॅशनच्या जगात महत्वाचे आहे. स्टाइलिश दिसण्यासाठी जाणून घ्या, विंटर ट्रेंड्स..!
हिवाळ्यात पडणारी गुलाबी थंडी, या थंडीत बाहेर पडताना येणारा कंटाळा आपल्याला माहित आहेच. परंतु जर आपल्या सोबत थंडीपासून बचाव करणारे स्टाइलिश स्वेटर असतील तर…
बहुरंगाची फिल्मी स्वेटर घालण्याची हौस अगदी भारीच असते. फॅशनच्या दुनियेत असाच वारा वाहत असतो. थंडीच्या दिवसांमध्ये स्टाइलिश दिसणं हे थोडं आव्हानात्मक असू शकतं, परंतु काही ट्रेंड्स आणि अॅक्सेसरीज अशा आहेत ज्यामुळे तुम्ही थंड हवामानातही स्टाइलिश आणि आरामदायक दिसू शकता.
ओव्हरसाइज ब्लेजर्स आणि जैकेट्स
हिवाळ्यात ओव्हरसाइज ब्लेजर्स आणि जैकेट्स हा एक मोठा फॅशन ट्रेंड मानला जात आहे. आहे. हा अगदी आरामदायक आणि स्टाइलिश दोन्ही असलेल्याने या डिझाइन्स तुम्हाला एक आकर्षक लुक देऊ शकतो.
तुम्ही याला स्किनी जीन्स किंवा लेगिंग्जसोबत हि परिधान करू शकता, ज्यामुळे तुमचा लुक आणखी स्मार्ट, गुडलॉकिंग आणि ट्रेंडी दिसेल.
फ्लफी स्वेटर्स
स्वेटर्स हा हिवाळ्याचा एक महत्त्वाचा हिस्सा असतो. आणि यावेळी फ्लफी स्वेटर्स फार लोकप्रिय झालेला आहे. यात विशेषतः मोठ्या कॉलरवाले स्वेटर्स किंवा बोल्ड रंगांचे स्वेटर्स ट्रेंडमध्ये आहेत. हे स्वेटर्स फुल स्लीव्सचे असतात आणि शरीरावर आरामदायक बसतात.
विंटर स्टाइल्ड शॉर्ट ड्रेस
शॉर्ट ड्रेस हा हिवाळ्यात देखील एका नवा लुक देणारा फॅशन ट्रेंड आहे. एक आरामदायक शॉर्ट ड्रेस, त्यावर थोडा ओव्हरकोट घालून एक स्टाइलिश आणि बेस्ट लुक ट्राय करू शकता. या लुकमध्ये तुम्ही बूट्स किंवा हाय हिल्ससुद्धा वापरू शकता.
हाय-वेस्ट ट्राऊझर्स
हाय-वेस्ट ट्राऊझर्स हिवाळ्यात खूपच बेस्ट आहेत. या ट्राऊझर्सची एक मोठी खासियत म्हणजे ते तुमच्या पिठाच्या भागाला अधिक आरामदायक बनवतात, आणि तुमचं शरीर अधिक स्लिम आणि टॉल दिसतं. याला तुम्ही ओव्हरसाइज स्वेटर किंवा टॉपसोबत परिधान करू शकतात.
किमोनो स्टाईल ओव्हरकोट्स
किमोनो स्टाईल ओव्हरकोट्स ही एक नवी आणि हटके फॅशन ट्रेंड आहे. हे ओव्हरकोट्स हलके आणि आरामदायक असतो आणि लूज फिट देशील असतात, ज्यामुळे हिवाळ्यात आरामदायक आणि स्टाइलिश दिसू शकता. याला फॉर्मल किंवा कॅज्युअल दोन्ही लुक्ससाठी वापरता येऊ शकतं.