
भारताचा फलंदाज केएल राहुलला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला. २३व्या षटकात मिचेल स्टार्क गोलंदाजी करत होता. स्टार्कचा चेंडू राहुलच्या बॅटजवळून गेला आणि यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीच्या ग्लोव्हजमध्ये समावला. ऑस्ट्रेलियन संघाने झेलबादाचे अपील केले, परंतु मैदानावरील पंचांनी राहुलला नाबाद ठरवले. यानंतर ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यू घेतला आणि रिप्लेमध्ये असे दिसून आले की राहुलच्या बॅटने त्याच्या पॅडला स्पर्श केला, ज्याचा आवाज अल्ट्रा-एजमध्ये स्पष्टपणे ऐकू आला.
तिसऱ्या पंचाने दुसऱ्या कोनातून चित्रीकरण पाहण्याची मागणी केली, पण ब्रॉडकास्टिंग टीमकडे दुसरा कोन उपलब्ध नव्हता. त्यामुळे टीव्ही पंचांकडे मैदानी पंचांचा निर्णय बदलण्यासाठी निर्णायक पुरावा नव्हता. तरीही, पंचांनी निर्णय बदलला आणि राहुलला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
राहुलच्या या निर्णयावर अनेक क्रिकेट दिग्गजांनी टीका केली आहे. ऑस्ट्रेलियाचे मॅथ्यू हेडन आणि इंग्लंडचे मार्क निकोल्स यांनी सांगितले की, “हा निर्णय बदलण्यासाठी पुरेसा कॅमेरा अँगल नव्हता, आणि त्यामुळे राहुलला बाद ठरवणे चुकीचे आहे.” भारताचे सुनील गावस्कर आणि संजय मांजरेकर यांनाही हा निर्णय योग्य नसल्याचे स्पष्ट केले.