
विजेत्या खेळाडूूंच्या आईवडिलांनी तसेच परिसरातील नागरिकांनी खेळाडूंवर फुलांची उधळण केली. तसचे पुष्पहार गळ्यात घालून पेढे भरवून त्यांचे कौतुक केले.
गोवा राज्यात पार पडली तायक्वांदो आणि बॉक्सिंग १८ वी युथ नॅशनल स्पर्धा
पुणे : गोवा राज्यातील मडगांव चौगुले स्पोर्ट्स कॉलेजमध्ये झालेल्या तायक्वांदो आणि बॉक्सिंग १८ व्या युथ नॅशनल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत खराडीतील युनिक स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी १८ सुवर्ण, २ रोप्य, २ कास्य पदकांची कमाई केली. या स्पर्धेत एकूण २२ पदकांची कमाई केल्याने खेळाडूंवर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे.
गोव्यात ही स्पर्धा ७ ते १० डिसेंबर २०२४ दरम्यान पार पडली. यामध्ये महाराष्ट्रासहित इतर राज्यातील ३७८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत पुण्यातील खराडी गावातील युनिक स्पोर्ट्स क्लबच्या २२ खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धा मध्ये जुनिअर, सब जुनिअर आणि सिनिअर अश्या वजन गटामध्ये पार पडल्या.
नयंती खैरे, काजल विश्वकर्मा, संचिता बनसोडे, शुभम गायकवाड, शुभम गावंडे, अक्षज शिंदे, सार्थक शेवाळे, तनय रामटेके, शताषी बरबडे, लास्या चलमेटी, जयश शिंदे, प्रांजल कदम, कृष्णा दळवी, अनुष्का जाधव, आदर्श सरोदे,आर्वीक रेड्डी, दीपक रेड्डी, गणराज कदम या खेळाडूंनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तर
कवीश नलावडे, अधिराज साठे यांनी रोप्य पदक जिंकले. समर्थ पवार आणि आलियान मुरूमकर या खेळाडूंनी कास्य पदक जिंकले. तसेच नयंती खैरे आणि काजल विश्व्कर्मा यांना बेस्ट रेफ्री या सन्मानाने गौवरविण्यात आले. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक किरण पालकर आणि परमेश्वर खोत यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, या सर्व खेळाडूंचे आमदार बापूसाहेब पठारे, माजी नगरसेवक महेंद्र पठारे, मुख्याध्यापक संदीप गावंडे, पत्रकार अमोल अवचिते यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. स्पर्धा पडल्यानंतर खेळाडू जेव्हा खराडीत दाखल झाले त्यावेळी त्यांच्या आई-वडिलांनी तसेच परिसरातील नागरिकांनी खेळाडूंवर फुलांची उधळण केली. तसेच पुष्पहार गळ्यात घालून पेढे भरवून त्यांचे कौतुक केलेे.