
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) MPSC घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा-२०२४ ही १ डिसेंबर रोजी होणार आहे. ही परीक्षा पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २ डिसेंबरला मुंबई महापालिकेच्या कार्यकारी सहायक पदासाठी Recruitment परीक्षा होणार आहे. राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा EXAM देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागणार आहे. त्यामुळे किमान २ डिसेंबर रोजी देण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा इतर तारखेला घ्यावी, अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी केली आहे..
मुंबई महापालिकेत कार्यकारी सहायक (लिपीक) MUMBAI CORPORATION या पदाच्या एकूण १८४६ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सरकारी नोकरी मिळविण्याची मोठी संधी असल्याने राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज दाखल केला आहे. यामध्ये राज्यसेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखिल मोठी आहे. लिपीक पदाची परीक्षा २ ते ६ डिसेंबर दरम्यान तसेच दिनांक ११ आणि १२ डिसेंबर रोजी परीक्षा होणार आहे. राज्यसेवा परीक्षा राज्यातील ३६ केंद्रावर होणार आहे. सर्वसामान्यपणे विद्यार्थी मुळ गावातील परीक्षा केंद्राला पसंती देतात. १ डिसेंबरला राज्यसेवेची परीक्षा दोन सत्रात पार पडणार आहे. सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ उशिरापर्यंत चालणार आहे. लगेच दुसऱ्या दिवशी मुंबई महानगरपालिकेची परीक्षा आहे. त्यामुळे विध्यार्थ्यार्थ्यांची धावपळ होणार. आहे काही विध्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी उशीर होऊ शकतो. यामुळे विद्यार्थ्यांची संधी हुकण्याती भीती आहे. त्यामुळे या परीक्षेच्या वेळापत्रकात पूर्ण बदल न करता केवळ २ डिसेंबर ऐवजी इतर तारखेली परीक्षा घ्यावी, असे विद्यार्थ्यांची मागणी आहे.
दरम्यान, राज्यातील विविध शहरांमधील केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in वेबसाईटवर प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी ते डाऊनलोड करून घ्यावेत आणि वेळापत्रकानुसार संबंधित केंद्रावर निश्वित वेळेत उपस्थित राहावे, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.
‘कार्यकारी सहायक’ (लिपिक) या पदासाठी १ हजार ८४६ रिक्त पदांसाठी भरती असणार आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून दिनांक २० ऑगस्टपासून दिनांक ९ सप्टेंबर २०२४ दरम्यान तसेच सुधारित जाहिरातीनुसार, दिनांक २१ सप्टेंबर २०२४ पासून दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. उमेदवारांसाठी २ डिसेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान तसेच ११ डिसेंबर २०२४ आणि १२ डिसेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या कालावधीदरम्यान रोज तीन सत्रांमध्ये परीक्षा होणार आहे. याठिकाणी उमेदवाराने केलेल्या अर्ज क्रमांक आणि पासवर्डने लॉगिन करता येईल. लॉगिन केल्यानंतर संबंधित उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध असलेले प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे. प्रवेश पत्रावर उमेदवारांसाठी परीक्षेसंदर्भात महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी या सूचना काळजीपूर्वक वाचून पुढील कार्यवाही करावी. दरम्यान, उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी ९५१३५३२३३ हा हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आला आहे. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान या क्रमांकावर उमेदवारांना संपर्क साधता येईल, असेही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळवण्यात येत आहे.
राज्यात स्पर्धा परीक्षांची तयारी लाखो विद्यार्थी आहेत. त्यामुळे शासनाच्या तसेच स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या विभागात रिक्त पदांसाठी निघालेल्या नोकर भरतीसाठी अनेक विद्यार्थी अर्ज करत असतात. मुंबई महापालिकेच्या लिपीक भरतीसाठी देखिल राज्य सेवा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यामुळे त्यांना परीक्षा देण्याची संधी ही मिळालीच पाहिजे. या परीक्षेच्या पूर्ण वेळापत्रकात बदल करण्याची गरज नाही. केवळ २ डिसेंबर ऐवजी दुसरी तारीख दिल्यास विद्यार्थ्यांना ते सोयीचे होईल.
- महेश घरबुडे, अध्यक्ष- स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन.