पुणे: विधानसभा निवडणुकीत भाजपाला देदिप्यमान यश मिळवून देणारे देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी,हीच सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मनस्वी इच्छा आहे” असे प्रतिपादन पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केले
राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती ला मतदारांनी भरभरून प्रेम दिले या मध्ये सर्वात मोठी कामगिरी ही भारतीय जनता पार्टीने केली आहे. ह्या विजयाचे खरे शिल्पकार म्हणून देवेंद्रजी फडणविस यांचे नाव अग्रस्थानी आहे. मागील सरकारच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पद देऊन त्यांना मानाचे स्थान दिले. तसाच मनाचा मोठेपणा या वेळी शिंदे साहेब दाखवतील अशी आशा आहे, असे घाटे म्हणाले
देवेंद्र फडणवीस यांची राज्यच्या मुख्यमंत्री व्हावेत या करता आज पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सारसबागेतील सिद्धिविनायक मंदिरात होम हवन तसेच महारतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील, कसब्याचे आमदार हेमंत रासने, प्रदेशाचे प्रवक्ते संदिप खर्डेकर, युवा मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे,शहर सरचिटणीस पुनीत जोशी, वर्षाताई तापकीर,राहुल भंडारे, महेश पुंडे, राजेंद्र शिळीमकर, सुशील मेंगडे, गणेश कळमकर, प्रमोद कोंढरे यांच्यासह माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.