
थिटे वस्ती, थिटे नगर आणि काळूबाई नगर येथील नागरिकांनी केले सत्कार सोहळ्याचे आयोजन
पुणे : राज्यात सर्वाधिक गाजलेल्या वडगाव शेरी मतदार संघात वडगाव शेरी मतदार संघात महाविकास आघाडी उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. त्यामुळे पठारे यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. पठारे यांच्या विजयामुळे त्यांचा नागरी सत्कार केला जात आहे. खराडीतीली थिटे वस्ती, थिटे नगर आणि काळूबाई नगर परिसरातील ग्रामस्थांनी पठारे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे शुक्रवारी (दि.१३) संध्याकाळी ७ वाजता आयोजन केले आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतील ऐतिहासीक यश मिळाले आहे. पुणे शहरात महायुतीला एक जागा सोडता इतर जागांवर विजय मिळवणे शक्य झाले. ती जागा म्हणजे वडगाव शेरी मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार सुनील टिंगरे यांचा ४ हजार ७१० मतांनी पराभव केला. पठारे यांनी राबविलेली सुक्ष्म प्रचार यंत्रणा, त्यांच्या मुलांसह मुलींनी केलला प्रचार आणि खराडीतील नागरिकांनी दाखविलेली एकजूट या जोरावर अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. पठारे यांची सामान्य नागरिकांशी जोडली गेलेले नाळ आणि विकास कामांचा धडाका यामुळे ते मतदारसंघात लोकप्रिय आहेत.
थिटे वस्ती, थिटे नगर आणि काळूबाई नगर येथील नागरिकांनी केले सत्कार सोहळ्याचे आयोजन केले असून सर्व मतदारांनी त्यांचे कौतुक करण्यासाठी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
