
पुण्यात पोलीसच असुरक्षीत ?
कायदा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
पुणे : पुणे शहर हे विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाते. तसेच सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. परंतु शांत पुण्याला गुंडगिरीचे ग्रहण लागले आहे. सामान्य माणूसच काय येथे तर पोलीसच असुरक्षित आहेत. गुन्हे शाखा युनीट-3 मधे काम करणाऱ्या अमोल काटकर यांच्यावर कोयत्याने वार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लॉ कॉलेज रोड वरून ड्यूटी संपवून घरी जात असताना रात्री 1 च्या सुमारास, दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांनी काटकर यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले.
कट मारल्याच्या वादात हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत काटकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सह्याद्री हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.