
स्वारगेट अत्याचार प्रकरण : आरोपीची माहिती देणाऱ्याला मिळणार एक लाख रुपयांचे बक्षीस
Pune : पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी सकाळी समोर आली.या घटनेमुले शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपील अटक करण्यास अद्याप पोलिसांना यश आले नाही. आरोपीची माहिती देणाऱ्याला पु्णे पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला आहे. हा प्रकार पहाटेच्या वेळी घडला आहे. स्वारगेट डेपोत आपल्या गावी चाललेल्या २६ वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग करून आरोपी दत्तात्रय रामदास गाडे ( वय. ३७ वर्षे) रा. गुनाट, ता. शिरूर, जि. पुणे) हा फरार झाला होता. पोलिसांनी गुन्हेगारास शोधण्यासाठी आठ पोलिस पथके रवाना केली आहेत.
मात्र या घटनेला होऊन तीन दिवस होत आहेत तरी अजून आरोपी सापडत नसल्याने अखेर स्वारगेट पोलिसांनी आरोपीची माहिती देणारास एक लाख रुपयाचे बक्षीस देण्याचे घोषित केले आहे. दरम्यान, आरोपीची माहिती देणाराचे नाव गुपित ठेवण्यात येणार आहे. या संबंधित स्वारगेट पोलिसांनी माहिती पत्रक जारी केले आहे.